नमस्कार, आपण सगळे कसे आहेत? नुकताच पावसाळा लागला आहे. आणि पावसाळ्यात आपल्याला बाहेर फिरायला जाण्याची इच्छा होते. आणि पावसाळ्यात डोंगर-दऱ्या , गड-किल्ले फिरण्याची मजाच वेगळी असते. कारण पावसाळ्यात सगळीकडे हिरवंगार असते. डोंगरावरून पावसाळ्यात धबधबे बघायला मिळतात. म्हणूनच या लेखात आपण 10 Best Places to Visit in Monsoon बघूया.
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रांत आहे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात भरपूर गड-किल्ले बांधलेले आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि रोमांचक आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि विस्तीर्ण प्रदेशात पसरलेले हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात महत्वपूर्ण ठरले. गड किल्ले म्हणजे केवळ ऐतिहासिक ठिकाणे नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि इतिहासाचे प्रतीक आहेत. म्हणूनच आपण एकदातरी या किल्ल्यांना visit तर द्यायलाच पाहिजे.
पण कुठेही जाताना आपल्याला त्या ठिकाणाविषयी पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. तर या लेखात महाराष्ट्रतिल गड-किल्ल्यांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात वसलेला आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. इथेच शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाले. रायगड किल्ल्याची उंची आणि त्याच्या आजूबाजूच्या निसर्गरम्य दृश्यांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे.
रायगडावर तुम्हाला पाचाडचा जिजाबाईंचा वाडा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिरकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, हिरकणी टोक, कुशावर्त तलाव हि सगळी ठिकाणे बघायला मिळणार.
Raigad fort Trek Details:
राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात वसलेला आहे. राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पहिल्या राजधानीच्या ठिकाणासाठी निवडले होते. किल्ल्याचे आधीचे नाव हे ‘मुरुंबदेव’ हे होते. पण शिवाजी महाराजांनी याचे नाव राजगड असे ठेवले.
पावसाळ्यात राजगडाचे सौन्दर्य अतिशय खुलून दिसते. हिरव्यागार वनराई, थंडगार वातावरण, आणि निसर्गाचे अद्भुत दृश्य हे पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात किल्ल्यावर चढाई करण्याचा अनुभव नक्कीच अविस्मरणीय असतो.
राजगडावर तुम्हाला पद्मावती तलाव, बालेकिल्ला, तोरणा किल्ला, संजिवनी माची, सुवेळा माची, पद्मावती माची, राजवाडा, गुंजवणे दरवाजा, काळेश्र्वरी बुरूज हे ठिकाण बघायला मिळणार. पुण्यावरून राजगडावर नसरापूरमार्गे वेल्हे गावातून किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे.
Rajgad fort Trek Details:
लोहगड हा महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेला असून पुणे जिल्ह्यात आहे. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. हा किल्ला मराठा आणि मुघलांच्या युद्धांमध्ये अनेकदा हस्तांतरित झाला.
लोहगड किल्ल्याचे भक्कम असे बांधकाम पर्यटकांना आकर्षित करते. या किल्ल्यावर तुम्हाला विनचुकाटा, लोहगडची माची, गणेश दरवाजा बघायला मिळेल. या शिवाय पावसाळ्यात धबधबे, धुके, आणि थंड वातावरण पर्यटकांना मोहून टाकते. ट्रेकिंग साठी लोहगड-विशापुर ट्रेक सुद्धा आहेत.
किल्ल्यावर जायला लोणावळा हे जवळचे ठिकाण आहे. लोणावळ्याहून मळवली स्टेशनला उतरून तिथून भुजी गावापर्यंत वाहनाने जाता येते.
Lohgad fort Trek Details:
शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेला आहे. शिवनेरी किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. शिवनेरी हा किल्ला महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्राचीन किल्ला आहे. हा किल्ला यादवांच्या काळात बांधलेला आहे. पुढे त्याचा ताबा मुघलांनी घेतला.
शिवनेरी किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव आहे. तसेच या किल्ल्याला एक बालेकिल्ला देखील आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. किल्ल्यावर पोहोचल्यावर तुम्हाला शिवजन्मस्थान, ७ जलदुर्ग, कमानी, किल्ल्याचे ७ प्रवेशद्वार, बुरुज, मेघडंबरी (उंच मनोरा), शिवकुंज, इत्यादी बघायला मिळणार.
Shivneri fort Trek Details:
प्रबळगड हा किल्ला रायगड जिल्ह्यात वसलेला असून पनवेल आणि माथेरान च्या मध्ये आहे. प्रबळगड ला आधी मुरंजन या नावाने ओळखले जात असे. या किल्ल्याच्या पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे.
प्रबळगड किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सुंदर असे दृश्य आहे. किल्ल्यावरून मुरुड, माथेरान, कर्जत, पनवेल आदी परिसराचे विहंगम दृश्य दिसते. ह्या किल्ल्यावर फिरण्यासाठी पावसाळा हा ऋतू खूप छान आहे. पावसाळ्यात ह्या किल्ल्याचे सौन्दर्य अतिशय खुलून दिसते.
प्रबळगडावर गेल्यावर तुम्हाला एक गणेश मंदिर व तीन पाण्याच्या टाक्या दिसेल. तसेच किल्ल्यावरून माथेरान चे विविध पॉईंट फारच सुंदर आणि आकर्षक दिसतात. गडाजवळ राहण्याची खाण्याची चांगली सोया आहे.
Prabalgad fort Trek Details:
कोथळीगड हा किल्ला पेठ किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. पेठ गावाजवळ वसलेला असल्यामुळे याला पेठचा किल्ला म्हणून ओळखला जातो. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे.
कोथळीगड हा किल्ला लहान आहे पण या किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी गुहा आहे. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना आहे जो किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला त्याच्या अनोख्या रचनेमुळे आणि सुंदर दृश्यामुळे प्रसिद्ध आहे.
या किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग पेठ गावातून जातो. किल्ल्यावर एक शिवमंदिर आहे. तसेच तिथे एक देवीची गुहा आहे. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत.
Kothaligad fort Trek Details:
कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यात वसलेला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे महामार्गावर असून पनवेल च्या अगदी जवळ आहे. ह्या किल्ल्याजवळचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखले जाते. ह्या किल्ल्याचा ट्रेक अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासून सुरु होते.
ह्या किल्ल्याचा सुळका विशेष लक्षवेधी आहे. हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मोठा वाद दिसेल. कर्नाळा किल्ल्यावर करणाई देवीचे मंदिर, तटबंदी, जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत. कर्नाळा किल्ल्याच्या माथ्यावरून सह्याद्री पर्वत रांगेतील अनेक किल्ले आणि पर्वत दिसतात.
कर्नाळा किल्ल्याचे निसर्ग सौन्दर्य पावसाळ्यात अधिक खुलून दिसते. तसेच जर ट्रेकिंग साठी जात असाल तर हिवाळ्यात उत्तम वातावरण असते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अभयारण्यात देखील तुम्ही जाऊ शकता.
Karnala fort Trek Details:
विसापूर उर्फ सम्बलगड हा किल्ला लोहगड-विसापूर धुरंधर गडकिल्ल्यांतील एक आहे. मुंबईवरून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी दिसेल. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो.
ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला पायऱ्या दिलेल्या आहेत. पायऱ्यांनी जाताना मारुतीचे देऊळ पडेल. त्या बाजूला दोन गुहा आहेत. गुहेत ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते.
गडावर गेल्यावर तुम्हाला पाण्याची तळी दिसेल. गडावर पसरलेली तटबंदी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातेही आहे. गडावर प्राचीन काळातील महादेवाचं मंदिर आहे व समोर एक मोठा तलाव आहे. ह्या किल्ल्यावर ट्रेकिंग साठी जायला २ रस्ते आहेत. दोन्ही रस्ते भाजे गावातून जातात.
Visapur fort Trek Details:
तिकोना किल्ला पुण्याजवळ असून पवना धरणाजवळ वसलेला आहे. ह्या किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे याला तिकोना असे नाव पडले. ह्या किल्ल्यापासून ३-४ किमी अंतरावर तुंग किल्ला आहे. तुंग किल्ला हा तिकोना किल्ल्यावरून दिसतो. तिकोना हा किल्ला पूर्वी वितंडगड म्हणून देखील ओळखला जात असे.
तिकोना किल्ल्यावरून आसपासचा प्रदेश खूप सुंदर दिसतो. किल्ल्यावरून तुंग किल्ला, पवन मावळ, आणि पवना जलाशयाचे देखील दृश्य दिसते. गडावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तसेच एक तलाव, २ तळी व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आहेत. किल्ल्याच्या खाली तुळजाभवानीचे मंदिर आहे.
तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरून थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात. तिकोना किल्ल्यावर पावसाळ्यात व हिवाळ्यात ट्रेकिंक चा अनुभव काही वेगळाच आहे.
Tikona fort Trek Details:
जीवधन किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेला असून घाटघर या शहरापासून १ किमी अंतरावर आहे. तसेच नाणेघाटापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हा किल्ला ट्रेकिंगच्या ५ प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. इथे ट्रेकिंग साठी खडकांच्या पायऱ्या आहेत, ज्या कल्याण दरवाजाकडे जातात.
जीवधन किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या “गोटेगाव” पासून ट्रेकिंग करावे लागते. या ट्रेकमध्ये काही कठीण चढाव आहेत, त्यामुळे हा ट्रेक मध्यम ते अवघड श्रेणीचा मानला जातो. साहस आवडणाऱ्यां ट्रेकर्सना हा ट्रेक खास आकर्षण आहे.
पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यावर ‘गजलक्ष्मीचे शिल्प‘ दिसते. तेथील स्थानिक लोक याला कोठी असे म्हणतात. तसेच दक्षिणेस जीवाई देवीचे मंदिर आहे. गडावर पाण्याची टाकी, पाच धान्य कोठारे, गडाच्या टोकाला ३५० फूट उंचीचा वानरलिंगी एक सुळका आहे. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
१८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते. इथे जायला २ मार्ग आहेत. त्यापैकी जुन्नर – घाटघर मार्गे असणारी वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा. इथे राहण्याची सोयः नाही. तसेच जेवणाची – पाण्याची सोयः स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत.
Jivdhan fort Trek Details:
Raigad fort, Rajgad fort, Karnala fort are best for trekking.
Rajgad fort is easy in Maharashtra.
Jivdhan fort is difficult to trek in Maharashtra.
SSC Stenographer Vacancy 2024 : स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC) हर साल स्टेनोग्राफर के पदों की…
LIC HFL Recruitment 2024 For Junior Assistant : LIC Housing Finance में Junior Assistant की…
India Post Office Recruitment 2024 : भारतीय डाक विभाग में 2024 की डाक सेवक की…
Indian Navy Recruitment for Civilian Staff 2024 : भारतीय नौसेना में अलग अलग पद के…
Indian Bank Recruitment for Apprentice : इंडियन बैंक में Apprentice पद के लिए vacancy निकली…
IBPS Clerk Vacancy 2024 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने 2024 में क्लर्क…
View Comments